भारतातील प्रथम बाजार समिति

बाजार समितीचा इतिहास

भारतातील बाजार नियमनांची सुरुवात फार जुनी आहे. सन 1886 साली हैदरबाद रेसिडेंसी ऑर्डर यांच्या हुकूमान्वये भारतात प्रथम कारंजा बाजार समितिची स्थापना झाली आणि कारंजा बाजार समितीचे नियमास त्यावेळेचे रेसिडेन्स सेक्रेटरी फॉर बेरार यांनी त्यांचे पत्र क्र.1762 दि.11 जुलै 1887 रोजी मंजूरी दिलेली असून कमिशनर ऑफ हैद्राबाद डिस्ट्रिक्ट यांनी सदरहू नियम दि. १ ऑगस्ट १८८७ पासून अमलात आल्याचे जाहीर केलेले आहे.

विदर्भामध्ये कारंजा येथे कापूस या शेतमालाचा बाजार भारतात सर्वप्रथम नियंत्रित केला गेला.(त्यानुसार कारंजा कृषि उत्पन्न बाजार समिति ही भारतात १८८६ साली सर्वप्रथम अस्तीत्वात आली.) आणि पुढे हैदराबाद राज्याकडुन मिळालेले जिल्हे ज्यांना वर्‍हाडचे जिल्हे मानले जातात , त्या जिल्हयांसाठी तत्कालीन बेरार कॉटन व ग्रेन मार्केट १८९७ यातील कलम २ अन्वये हैदराबाद रेसिडेन्सिचा वर्‍हाड करिता असलेल्या सचिवची अधिसूचना क्रं ७९ अदिनांक १-४-१८९८ नुसार प्र. कारंजा तालुका कारंजा जि.अकोला येथील कापूस बाजार समितीच्या मर्यादा सर्वप्रकारच्या कापसाच्या खरेदी –विक्री करिता ठरवून दिलेल्या आहेत आणि तत्कालीन कमिशनर नागपुर डिविजन नागपुर यांनी मध्य प्रांत आणि वर्‍हाड च्या शेती उत्पन्न बाजारावरील १९३५ च्या अधींनियमाच्या कलम ३ (१) अन्वये कारंजा येथील वरील कापूस बाजार च शेतकी उत्पन्नाच्या खरेदी विक्री करिता ठरवून दिलेल्या आहेत.