भारत हा कृषि प्रधान देश आहे. ह्या देशातील ७५  ते ८०टक्के लोक शेती या व्यवसायावर आपली उपजिविका करतात म्हणून कृषि व्यवसाय हा भारतवासीयांचा जीवन मार्ग,जीवनधारणा आहे.एकूण उत्पन्नाच्या ६० ते ७५ टक्के भाग शेती उत्पन्नापासून मिळत असल्याने कृषि उत्पादन हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे.भारत सरकारने शेती व्यवसायावर सुधारनेच्या दृष्टीने बर्‍याच योजना आखल्या.शेती सुधारनेस देशाच्या पंचवार्षिक योजनेस महत्वाचे स्थान दिलेले आहे.शेतकर्‍याची परिस्थिति सुधारण्याकरिता अनेक कडे करण्यात आलेले आहेत.शेती उत्पादन वाढविण्याकरिता कालवे,विहिरी,पाझर तलाव,जमीन सुधारण्याकरिता बी-बियाणे खते यांचा पुरवठा करण्यात आलेला आहे. शुद्ध व चांगले बी-बियाणे प्रमाणित करून शेतकर्यांना पुरविण्यात येतात.शासनाने बियाणे मंडळाची स्थापना करून योग्य व प्रमाणित बियाण्यांचा साठा उपलब्ध करून दिलेला आहे.

भारतातील बाजार नियमनांची सुरुवात फार जुनी आहे. सन 1886 साली हैदरबाद रेसिडेंसी ऑर्डर यांच्या हुकूमान्वये भारतात प्रथम कारंजा बाजार समितिची स्थापना झाली आणि कारंजा बाजार समितीचे नियमास त्यावेळेचे रेसिडेन्स सेक्रेटरी फॉर बेरार यांनी त्यांचे पत्र क्र.1762  दि.11 जुलै 1887 रोजी मंजूरी दिलेली असून कमिशनर ऑफ हैद्राबाद डिस्ट्रिक्ट यांनी सदरहू नियम दि. १ ऑगस्ट १८८७ पासून अमलात आल्याचे जाहीर केलेले आहे.